ना. राणेंच्या “एमएसएमई” खात्यामार्फत सिंधुदुर्गनगरीत चर्मोद्योग प्रशिक्षण
विजय केनवडेकर यांची माहिती ; इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार व खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी आयटीआय येथे एक दिवसाचे चर्मोद्योग प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्याला चर्मोद्योग उद्योगासाठी आवश्यक असणारे साहित्य टूलकिट देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी याची वयोमर्यादा १८ ते ५२ वर्षापर्यंत असावी, एसी/एसटी मधील प्रशिक्षणार्था याला टुलकिट साठी १०% पैसे भरावे लागतील. तर दारिद्ररेषेखाली असणाऱ्या प्रशिक्षणार्थाला हे मोफत देण्यात येईल. चर्मकार समाजातील प्रशिक्षणार्थीला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी आधार कार्ड झेरॉक्स, दोन फोटो, जात प्रमाणपत्र झेरॉक्स अशी कागदपत्रे आवश्यक असून प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीना शासकीय सहभाग सर्टिफिकेट देण्यात येईल. कर्ज घेताना हे प्रमाणपत्र उपयोगी पडणार आहे. चर्म उद्योगांमध्ये असणाऱ्या संधी याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. १० युवकांनी एकत्र येऊन चर्मोद्योग करण्यास सुरुवात करत असल्यास या युवकांना मोफत प्रशिक्षण व आठ लाखापर्यंत ९०% टक्के सबसिडी असणारे अनुदान असणारा कर्ज पुरवठा यासंबंधी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. एस सी /एस टी उद्योजकाने उत्पादित केलेला माल सरकार कसे विकत घेते या संदर्भातली माहिती, व्यवसाय करण्यासाठी MSME मार्फत देणारी सुविधा याची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण सर्वासाठी खुले आहे. यात ४० प्रशिक्षणार्थीना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रशिक्षणाचा युवकांनी फायदा घ्यावा. अधिक माहिती साठी विजय केनवडेकर मो – ९४२०२०६८७३ यांच्याशी संपर्क साधावा.