पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १०० व्या “मन की बात” मध्ये मनिष दळवी यांचाही सहभाग
आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे बँकेच्या माध्यमातून अनेक नवनवीन योजना आणून जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून झटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात दिलेले योगदान व अध्यक्ष मनीष दळवी यांचे ग्रामीण विकासासाठी चालू असलेले प्रयत्न याची दखल केंद्रस्तरावरही घेण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या १०० व्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधीत करणार आहेत. केंद्र व शासनाच्या वतीने हा कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदया ११ वाजता सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मन की बात कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी काही विशेष निमंत्रितांना निमंत्रीत केले आहे. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना ही या कार्यक्रमात विशेष निमंत्रीत केले आहे.