भाई मांजरेकर यांच्यासह तिघांचा पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव
शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचाही समावेश ; सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान
मालवण : मालवण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कमलाकर उर्फ भाई मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचामहिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कृषी अधिकारी संजय गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, उपाध्यक्षा शीतल कांबळे, आयसीडीएस पर्यवेक्षिका उल्का खोत, मृणाल सावंत, प्रिया परब, भिमसेन पळसंबकर, संजय बंगडे, बापू बावकर, संतोष निकम, सतिष कदम, समीर टाकेकर यासह व्यवस्थापक गीता चौकेकर, उपजीविका सल्लागार आशिष मडवळ, लेखापाल दामिनी सकपाळ, सहयोगीनी स्मिता लंगोटे, मंगल तांबड यासह अन्य उपस्थित होते.
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्प द्वारा महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने जेंडर व न्यूट्रिशन घटक अंतर्गत तालुकास्तरीय पुरुष सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम अथर्व सभागृह कुंभारमाठ मालवण येथे संपन्न झाला. कट्टा केंद्र अंतर्गत तालुक्यातील ३० गावात काम सुरू आहे. ३०० पेक्षा जास्त बचतगट यात सहभागी आहेत. तालुक्यात काम सुरू असताना महिलांसोंबत पुरुषांचाही सन्मान व्हावा. या उद्देशाने २२ जणांतून हे सन्मान करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे, पर्यवेक्षिका खोत, कृषी अधिकारी गोसावी यांनी विचार मांडले.व्यवस्थापक गीता चौकेकर यांनी प्रास्ताविक करत महिलांनी महिलांसाठी चालवलेले संघटना अश्या स्वरूपात सिंधुकन्या लोकासंचालित साधन केंद्र कट्टा यांची यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या हस्ते साधन केंद्राच्या सर्वांचा एकत्रित सन्मान करण्यात आला.