सागरसुंदरी स्पर्धेत मुंबईच्या समीधा कुबलची बाजी !

जामसंडेची डॉ. निशा धुरी द्वितीय तर धुरीवाड्याची लतिका शिर्सेकर तृतीय क्रमांकाची मानकरी

मालवण : गाबीत महोत्सवानिमित्त मालवण येथील दांडी किनारपट्टीवर घेण्यात आलेल्या सागर सुंदरी स्पर्धेत मुंबीच्या समिधा कुबल हिने बाजी मारत सागर सुंदरीचा ‘किताब पटकाविला. तर जामसंडे येथील डॉ. निशा धुरी यांनी द्वितीय आणि मालवण धुरीवाडा येथील लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.

मालवण दांडी समुद्र किनारी गाबीत महोत्सव साजरां होत असून या महोत्सवात काल सागर सुंदरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गाबीत समाजातील १४ तरुणींनी सहभाग घेतला होता. पारंपारिक वेशभूषा, पश्चिमात्य वेशभूषा व कला सादरीकरण, मनपसंत फेरी अशा तीन प्रश्नमंजुषा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या सर्व फेऱ्यांमध्ये वरचढ ठरत मुंबईच्या समिधा कुबल हिने सागर सुंदरीचा ‘किताब पटकावीला. तर डॉ. निशा धुरी हिने द्वितीय व लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळावीला. तर विजेत्या समिधा हिला क्राऊन व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक तर द्वितीय व तृतीय क्रमांकास क्राऊन व रोख रक्कम देऊन अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर बेस्ट स्माईल – सोनिया कोचरेकर (वेंगुर्ला), बेस्ट पर्सनॅलिटी – दीपशिखा रेवंडकर (दांडी मालवण), बेस्ट फोटोजेनिक फेस – हर्षदा कांदळगावकर (देवगड), बेस्ट कॉश्युम – प्राची जोशी (मालवण) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेची पारितोषिके सौ. अन्वेषा आचरेकर, सेजल परब, दीपिका घारे, नारायण धुरी, वैभव खोबरेकर यांनी पुरस्कृत केली होती. परीक्षण लक्ष्मीकांत खोबरेकर व सौ. मनस्वी कुबल यांनी केले. स्पर्धेसाठी चेतन हडकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, महेंद्र पराडकर, जिल्हा सचिव रविकिरण तोरसकर, पूजा सरकारे, सेजल परब, अन्वय प्रभू, सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, संमेष परब, रुपेश खोबरेकर, नारायण धुरी, वैभव खोबरेकर, रुपेश खोबरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू आदी व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!