“गाबीत” झेंड्याखाली एकत्र या ; माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन

मालवणमध्ये आयोजित गाबीत महोत्सवाचे शानदार उदघाटन

मालवण : गाबीत समाजातील अनेक बांधव आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. विखूरलेल्या गाबीत बांधवांना एकत्र आणण्यासाठी आजचा महोत्सव आयोजित केला असून प्रयत्न केला असून गाबीत बांधवांनी गाबीत या एका झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गाबीत महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्रकिनारी आयोजित गाबीत महोत्सवाचा शुभारंभ काल सायंकाळी भव्य मोटारसायकल रॅली व दांडी किनाऱ्यावरून शोभायात्रा काढून करण्यात आला. तर दांडी येथील महोत्सव स्थळी मान्यवरांच्या हस्ते गाबीत ज्योत प्रज्वलीत करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत महासंघाचे कार्याध्यक्ष दिगंबर गावकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, माजी अध्यक्ष काशिनाथ तारी, महाराष्ट्र गाबीत महासंघाचे अध्यक्ष सुजय धुरत, सचिव गणपत मणचेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव महेंद्र पराडकर, कारवार गाबीत समाज अध्यक्ष राम जोशी, गाबीत समाज गोवाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ हळणकर, गाबीत समाज रत्नागिरीचे माजी अध्यक्ष सुधीर मोंडकर, मालवण अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, वेंगुर्ला अध्यक्ष दिलीप गिरप, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, सावंतवाडी अध्यक्ष ऍड. संदीप चांदेकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, जिल्हा कार्यवाह बाबासाहेब मोंडकर, जिल्हा खजिनदार सहदेव बापर्डेकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, मेघनाद धुरी, स्वागत समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, माजी जि. पं. सदस्य हरी खोबरेकर, श्रमिक मच्छिमार संघांचे अध्यक्ष छोटू सावजी, श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष मिथुन मालंडकर, राजा गावकर, बाबी जोगी, माजी नगरसेविका सेजल परब, पूजा सरकारे, दर्शना कासवकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, सौरभ ताम्हणकर, सतीश आचरेकर, स्नेहा केरकर, संजय केळूसकर, पंकज सादये, नारायण कुबल, नरेश हुले, संमेश परब, नारायण धुरी, भाई कुबल, उल्हास तांडेल, विकी चोपडेकर, दांडी गाव अध्यक्ष निलेश कांदळगावकर, जगदीश खराडे, आप्पा पराडकर, रुपेश खोबरेकर आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रारंभी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार जीजी चोडणेकर, बाळ जुवाटकर, श्री. कालमित्र (कालमेतर), अमृता जोशी यांना गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आचरा – मुंबई येथील उद्योजक सचिन कुबल, जादूगार विनयराज (विनय उपरकर) डॉ. निशा धुरी यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, गाबीत समाजाच्या विविध प्रश्ना बाबत आपण मुख्यमंत्र्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. गाबीत समाजाला कामगारांचा दर्जा द्यावा, काही जातीप्रमाणे फक्त सरपंच अथवा पोलीस पाटील यांच्या दाखल्यावरून गाबीत बांधवांना जातीचा दाखला देण्यात यावा, तसेच देवगड येथे होणाऱ्या गाबीत भवनासाठी मुख्यमंत्री फंडातून निधी मिळावा, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असेही उपरकर म्हणाले.

यानंतर इतिहास संशोधक डॉ. अमर आडके यांचे गाबीत समाज व शिवकाल या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. तसेच आचरा व देवगड कट्टा येथील गाबीत बांधवांचे शिमगा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे व सौ. ज्योती तोरसकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!