आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर मसुरे येथील रमाई नदी मधील गाळ काढण्यास सुरुवात

स्थानिक ग्रामस्थांमधून मागणीप्रमाणे कामास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे ग्रामस्थांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत मागणी केली होती. रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाकडे गेली 30 वर्ष मागणी करीत होते. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीची तरतूद केली. मागील वर्षे सदर कामास सुरुवात होऊन पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात आला. आज नव्याने दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरुवात करून रमाई नदीला मोकळा श्वास घेण्यासाठी कामाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या मागणीप्रमाणे रमाई नदी मधील गाळ काढण्यास निधीची तरतूद करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मसुरे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, छोटू ठाकूर, पिंट्या गावकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत, अशोक मसुरकर, रमेश पाताडे, साई बागवे, सत्यविजय भोगले, वैभव मसुरकर, विनायक चव्हाण, राघवेंद्र मुळीक, अमित बागवे, गोलतकर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!