वीज चोरी : चौके, नांदरुख येथील तिघा चिरेखाण व्यावसायिकांना ३०.९९ लाखांचा दंड

वीज वितरण भरारी पथकाची कारवाई ; संबंधितांकडून दंडाच्या रक्कमेचा भरणा

मालवण : महावितरण भरारी पथकाने मालवण तालुक्यातील चौके, नांदरुख परिसरात धडक कारवाई केली आहे. यादरम्यान वीज चोरी करताना सापडून आलेल्या तीन चिरेखाण व्यावसायिकांवर १४ लाख ६१ हजार, ५ लाख ५० हजार, १० लाख ८८ हजार अशी एकूण ३० लाख ९९ रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यातील तीनही चिरेखाण व्यावसायिकांनी दंड रक्कम भरणा केली. अशी माहिती महावितरण भरारी पथकाच्या वतीने वीज अधिकारी यांनी दिली आहे.

चौके, नांदरुख परिसरात मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यवसाय चालतो. चिरे साईजमध्ये कापण्यासाठी मोठ्या मशीनचा वापर होतो. याला वीजपुरवठा ही मोठया प्रमाणात लागतो. याच ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे भरारी पथकास दिसून आले. त्यांनंतर पुढील कारवाई करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!