निलेश राणे चषकाचा आज ठरणार मानकरी ; दिग्गजांच्या उपस्थितीत होणार पारितोषिक वितरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित
विजेत्याला मिळणार तब्बल ३.५० लाख आणि मानाचा निलेश राणे चषक ; तर उपविजेत्याला मिळणार १.७५ लाख आणि चषक ; क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित निलेश राणे चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर शनिवारी रात्री होणार आहे. त्यामुळे कोण होणार निलेश राणे चषकाचा मानकरी याबाबत क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेतील विजेत्याला तब्बल ३.५० लाख रुपये आणि मानाचा निलेश राणे चषक मिळणार आहे. तर उपविजेत्याला १.७५ लाख आणि चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित करण्यात येणारी निलेश राणे चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा ही सिंधुदुर्गातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. गुरुवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राजाराम वॉरिअर्स आणि संतोष पारकर कासार्डे हे दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. शनिवारी २२ रोजी अंतीम दिवशी दोन उपांत्य फेरीच्या लढती आणि अंतीम सामना असे तीन सामने खेळविण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री उशीरा माजी खासदार निलेश राणे यांनी स्पर्धेला भेट देवून सामन्यांचा आनंद लुटला. गुरुवारी पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या सामन्यात राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघाने मन्सूर स्पोर्टस् वायरी संपाचा अतीतटीच्या लढतीत पराभव केला. तर दुसऱ्या लढतीत ध्रुव पार्से, गोवा संघाने चुरशीच्या लढतीत जागृती डोंबिवली संघाचा पराभव केला तिसन्या सामन्यात सागर दांडी संघाने शिरसाट स्पोर्टस् संघाचा पराभव केला तर चौख्या सामन्यात संतोष पारकर कासार्डे संघाने मुंबई ०९ डोंगरी संघाचा पराभव केला. पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात राजाराम वॉरियर्स संघाने सागर दांडी संघाचा पराभव केला. तर दुसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात संतोष पारकर कासाई संघाने ध्रुव पार्ने संघाचा पराभव केला पहिल्या दिवशी राजाराम वॉरिअर्स आणि संतोष पारकर कासार्ड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेत पंच उमेश मांजरेकर, दिपक धुरी, आंब्रोज आल्मेडा, मंगेश धुरी, सुशिल शेडगे हे आहेत, गुणलेखन विल्सन फर्नाडिस हे करत आहेत. समालोचन प्रदीप देऊलकर, विजय बागायतकर, शाम वाक्कर, अमोल जमदाडे, बादल चौधरी तर सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर हे होते.