Category विधानसभा निवडणूक 2024

कुंभारमाठ उबाठा गटाचे माजी सरपंच प्रमोद भोगावकर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल !

कुंभारमाठ शिवसेना शाखाप्रमुखपदी नियुक्ती ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : कुंभारमाठ गावातील उबाठा शिवसेनेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशकर्त्यांमध्ये…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा झंझावात ; गावराईत उबाठा युवासेनेचा उपविभागप्रमुख शिवसेनेत

नांदोस गावात खळाबैठक : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर दत्ता सामंत यांचा झंझावात कुडाळ, मालवण मतदार संघात पाहायला मिळत आहे. दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला ठिकठिकाणी…

उद्धव ठाकरे यांची बुधवारी मालवणात जाहीर सभा

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी टोपीवाला हायस्कूल ग्राउंड मालवण येथे…

दत्ता सामंत यांचा असरोंडीत उबाठाला धक्का ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. असरोंडी मळीगावठण / तानेकोंड येथील उबाठाच्या कार्यकर्त्यानी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये विनायक सावंत, देऊ घाडीगावकर, मयूर घाडीगावकर, प्रियेश घाडीगावकर यांचा समावेश आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाचा महायुतीला पाठिंबा ; तिन्ही उमेदवारांचा प्रचार करणार 

जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांची माहिती  मालवण : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची…

विकासाचा थांगपत्ता नसल्याने वैभव नाईकांवर गल्लोगल्ली कांदे बटाटे सारखी गाडी फिरवण्याची वेळ

भाजपाचे शक्तिकेंद्र प्रमुख केदार झाड यांचे हरी खोबरेकरांच्या टिकेला प्रत्युत्तर ; दहा वर्षात एकही प्रकल्प आणण्यात आमदार अपयशी मालवण | कुणाल मांजरेकर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांना स्वतःच्या मुलासाठी घरोघरी फिरावे लागल्याची टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख…

बुधवळे गावात शिवसेनेत झालेला प्रवेश भाजपा कार्यकर्त्यांचाच ; उबाठाशी संबंध नाही…

युवासेना उपसमन्वयक बंडू गावडे यांचा दावा ; वैभव नाईकांना मिळणारा प्रतिसाद पाहून पायाखालची वाळू घसरल्याची टीका मालवण : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत बुधवळे गावात झालेल्या प्रवेशाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणताही संबंध नाही. याठिकाणी भाजपच्या…

नितेश राणेंचा झटका : कणकवलीत उबाठा सेना उपजिल्हाप्रमुखाच्याच घराला सुरुंग 

चानी जाधव यांच्यासह उबाठा सेनेचे कार्यकर्ते भाजपात  कणकवली : महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी एक झटका दिला असून ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह ठाकरे शिवसैनिकांनी आमदार…

कुडाळ कविलकट्टाचा उबाठाचा बालेकिल्ला ढासळला ; निलेश राणेनी लावला सुरुंग

उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; दहा वर्षात कोणतीही विकासकामे झाली नसल्याची खंत कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा समजला जाणारा कविलकट्टा हा बालेकिल्ला अखेर ढासळला. येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांचे उबाठाला धक्के सुरूच ; बुधवळेतील उबाठाचे कार्यकर्ते शिवसेनेत !

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्के सुरूच ठेवले आहेत. मालवण तालुक्यातील बुधवळे मधील माजी शाखाप्रमुख समीर घागरे, माजी ग्रा. पं. सदस्य कुणकेश येरम यांच्यासह कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्री.…

error: Content is protected !!