बुधवळे गावात शिवसेनेत झालेला प्रवेश भाजपा कार्यकर्त्यांचाच ; उबाठाशी संबंध नाही…

युवासेना उपसमन्वयक बंडू गावडे यांचा दावा ; वैभव नाईकांना मिळणारा प्रतिसाद पाहून पायाखालची वाळू घसरल्याची टीका

मालवण : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत बुधवळे गावात झालेल्या प्रवेशाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणताही संबंध नाही. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला याचा वैभव नाईक यांना जनते मधून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून शिंदे गट आणि भाजपा मधील या प्रवेशाचा संबंध ठाकरे शिवसेनेशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचा दावा युवासेना उप समन्वयक बंडू गावडे यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले हे सर्वजण पूर्वीचे भाजपचेच कार्यकर्ते होते, भाजपचेच कार्यकर्ते शिंदे सेनेत घेऊन भाजपा संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3806

Leave a Reply

error: Content is protected !!