दत्ता सामंत यांचा असरोंडीत उबाठाला धक्का ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. असरोंडी मळीगावठण / तानेकोंड येथील उबाठाच्या कार्यकर्त्यानी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये विनायक सावंत, देऊ घाडीगावकर, मयूर घाडीगावकर, प्रियेश घाडीगावकर यांचा समावेश आहे.

दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, मकरंद राणे, मंदार लुडबे, मंगेश गावकर, मिहीर राणे, राजू बिडये, चंद्रकांत गोलतकर, भाऊ मोर्जे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3859

Leave a Reply

error: Content is protected !!