शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांचे उबाठाला धक्के सुरूच ; बुधवळेतील उबाठाचे कार्यकर्ते शिवसेनेत !
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्के सुरूच ठेवले आहेत. मालवण तालुक्यातील बुधवळे मधील माजी शाखाप्रमुख समीर घागरे, माजी ग्रा. पं. सदस्य कुणकेश येरम यांच्यासह कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्री. सामंत यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यामध्ये महादेव घागरे, आकाश परब, अशोक शिरसेकर, साहिल शिरसेकर, किरण जोईल, समीर मुणगेकर, रणजित घागरे, विघ्नेश येरम, अविनाश सरमळकर यांचा समावेश आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, युवासेना पदाधिकारी प्रीतम गावडे, विनायक बाईत, निलेश बाईत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.