कुडाळ कविलकट्टाचा उबाठाचा बालेकिल्ला ढासळला ; निलेश राणेनी लावला सुरुंग
उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; दहा वर्षात कोणतीही विकासकामे झाली नसल्याची खंत
कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा समजला जाणारा कविलकट्टा हा बालेकिल्ला अखेर ढासळला. येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू, असे सांगत त्यांना दहा वर्षे दिली मला फक्त अडीच वर्ष द्या हा मतदारसंघ आदर्शवत बनवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.
कुडाळ शहरातील कविलकट्टा हा भाग गेली कित्येक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्यांमध्ये इतर पक्षाला कोणतेही स्थान नव्हते. माजी सभापती दिवंगत बाळा जळवी यांनी हा बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. मात्र हा बालेकिल्ला ढासळला. दिवंगत बाळा जळवी यांच्या घरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सभापती दिवंगत बाळा जळवी यांच्या प्रतिमेला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, विश्वास गावकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, श्रीमती सरस्वती जळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरविंद करलकर, बंटी तुळसकर आधी उपस्थित होते
यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे म्हणाले, गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ दुर्लक्षित झाला आहे. मात्र येत्या अडीच वर्षात मतदार संघ आदर्शवत बनवल्या शिवाय राहणार नाही. तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. या विकास प्रक्रियेत तुम्हाला कुठेही दुरावले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी कविलकट्टा नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या गेल्या दहा वर्षात या रस्त्याची अवस्था खडतर झाली आहे. पुराचे पाणी येत असल्यामुळे वाहतूक ठप्प होते या सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षापासून रखडले आहे. त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
प्रवेशकर्त्यांमध्ये काँग्रेसच्या रंजना जळवी, तर उबाठा शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिक बाळा पेडणेकर, संतोष साळगावकर, अमित उर्फ चिंक्या जळवी, निलेश जळवी, सुवर्णा पेडणेकर, राजाराम गडेकर, रवी जळवी, गणपत हरमलकर, राहुल जळवी, आदिती जळवी, वनिता जळवी, दत्ताराम जळवी, दीपक जळवी, प्रसाद जळवी, अहिल्या जळवी, दिपाली जळवी, साहिल जळवी, वैभव जळवी, सदानंद साळगावकर, सोनाली साळगावकर, विष्णू साळगावकर, राजेंद्र जळवी, निलेश रमेश जळवी, शिवाजी जळवी, सुभद्रा जळवी, नंदा जळवी, गोपिका जळवी, कृष्णा जळवी, गजानन जळवी, निलेश जळवी, रमेश जळवी, रेणुका जळवी, आनंद साळगावकर, दिव्या जळवी, केशव जळवी, रिया गडेकर, सत्यवान जळवी, सत्यवती जळवी, रोहन जळवी, चैतन्य बावकर, कृतिका रुपेश सरंबळकर, श्रद्धा सरंबळकर, वैभवी तारी, सिद्धेश जळवी, सिद्धी जळवी, मनीषा पाटकर, दर्शना मातोंडकर आदींनी प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश कांदे यांनी केले. प्रास्ताविक आनंद अणावकर यांनी केले.