Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग | जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूकांची भाऊगर्दी

जि. प. च्या ५० जागांसाठी २७३ तर पं. स. च्या १०० जागांसाठी तब्बल ४४० उमेदवारी अर्ज दाखल सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छूकांची एकच गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी जिल्ह्यात पाहायला…

आचरा : सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा सांबारी, मांगरीश सांबारी यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी तसेच उद्योजक मांगरीश सांबारी यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.मालवण येथील निलरत्न…

तारकर्लीत मासेमारी नौका व जाळी आगीत जळून खाक

घातपाताचा संशय ; दाजीबा कुबल यांचे सुमारे 2 लाखाचे नुकसान मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथील मच्छीमार भालचंद्र ऊर्फ दाजीबा कुबल यांच्या मासेमारी व्यवसायातील छाेटी नौका पात व जाळी आगीत जळाली. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. अज्ञाताने घातपात…

शिवसेनेकडून कुडाळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर ; आ. निलेश राणेंच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल यांच्यासह दिग्गजांना संधी ; रुपेश कानडे यांचा शिवसेनेत प्रवेश, माणगांव जि. प. मधून उमेदवारी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ येथील रुपेश कानडे यांनी मंगळवारी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत…

महायुतीनंतर भाजपात नाराजी सुरूच ; पेंडूर जि. प. प्रभारी सतीश वाईरकर यांच्यासह २६ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये भाजप शिवसेनेत महायुती झाली असून मालवण तालुक्यात भाजपच्या वाट्याला कमी जागा मिळाल्याने पक्षात नाराजीची मोठी लाट पसरली आहे. मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या २७ पदाधिकारी यांनी राजीनामा दिला…

संघटीतपणे लढा दिल्यानेच यश ; भविष्यातही गटबाजी न करता एकत्र या

कंत्राटी कामगारांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात कामगार नेते अशोक सावंत यांचे आवाहन कुडाळ : आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही. अन्यायाच्या विरोधात आपण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. महावितरण कामगारांवर अन्याय झाला, त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा…

धर्मरक्षण आणि हिंदू संस्कृती या विषयावर जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवणच्यावतीने आयोजन : आंगणेवाडी यात्रेत बक्षीस वितरण मालवण : हिंदू धर्मावरील संकटांचा सामना करण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये धर्माबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने ‘जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे’ आयोजन…

ठाकरे शिवसेनेच्या मालवण तालुका कार्यकारणीची उद्या सभा

मालवण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका कार्यकारणीची सभा उदया रविवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे शिवसेनेच्या तालुका कार्यालयात होणार आहे. तरी सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,…

राज्यात भाजपचा महाविजय : मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपने महाविजय मिळवला आहे. या महाविजयाचे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे फायरब्रँड युवा नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यानी भेट घेऊन अभिनंदन केले. आज संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीचा ऐतिहासिक विजय…

मुंबई मनपा निवडणूक : माजी खा. विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांची बाजी

मुंबई : केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांनी प्रभाग क्र. ८९ मधून विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक ८९ मध्ये एकूण ११ उमेदवार निवडणूक…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी…

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय…

error: Content is protected !!