Category News

मालवणच्या आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सामाजिक बांधिलकी

मसुरे नं.१ शाळेला स्पिकर ट्राँली भेट ; शिक्षक, संस्था पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक सेवेमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विक्रीमध्ये जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे. मालवण तालुक्यातील जि.प. मसुरे शाळा…

मालवण मधील नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच ; महेश कांदळगावकर यांनी केली मदत

वीज मंडळाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील धुरीवाडा येथे शुक्रवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत शिलाई मशीन दुरुस्ती व टेलरिंग अशी दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये दुकानमालक विलास परुळेकर तसेच टेलरिंग व्यावसायिका सौ.…

आ. वैभव नाईक यांची तत्परता ; आगीच्या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी भेट

नुकसानग्रस्त विलास परुळेकर यांना रोख मदत सुपूर्द मालवण : शहरातील धुरीवाडा येथे दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ मालवणला भेट दिली. यावेळी गस्त दुकान…

महेंद्र चव्हाण यांची भाजपाच्या तालुका उपाध्य्यक्षपदी नियुक्ती

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार भाजपच्या मालवण तालुका उपाध्यक्ष (प्रशासकीय कामकाज) पदी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू…

आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवरायांचे भव्य सिंहासन !

आ. नाईक यांनी केली पाहणी : खास दगडाचा वापर ; दोन- तीन दिवसात काम पूर्ण होणार मालवण | कुणाल मांजरेकर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात भव्य…

आगीतील नुकसानग्रस्त विलास परुळेकर यांना मंदार केणी यांच्याकडून मदतीचा हात

मालवण : शहरातील धुरीवाडा येथे शुक्रवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये दुकानमालक विलास परुळेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी यांच्याकडून श्री. परुळेकर यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात…

कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिरात ३० जणांचा सहभाग

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त सिद्धिविनायक पटांगणावर आयोजन मालवण : माघी गणेश जयंती निमित्त कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील शासकीय…

मालवणात भल्या पहाटे अग्नीतांडव ; दोन दुकाने जळून खाक

सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील धुरीवाडा येथे भल्या पहाटे आगीचे तांडव पाहायला मिळाले. धुरीवाडा बोर्डिंग ग्राऊंड परिसरात दोन दुकानांना आग लागून ही दुकाने जळून खाक झाली. या दुकानात कपडे, शिलाई…

टोपीवालाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचा अश्वभारती फाउंडेशन कडून सत्कार

भाजपा नेते, उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा १९ वर्षांखालील मुलींचा संघ विजेता ठरला. या संघाचा मुंबईतील…

भाजपा महिला आघाडीच्या वतीने उद्या मालवणात हळदीकुंकू समारंभ

मालवण : भाजपा महिला आघाडीच्या वतीने उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ४ वा. पासून कोणार्क रेसिडन्सी येथील पक्ष कार्यालयात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!