आगीतील नुकसानग्रस्त विलास परुळेकर यांना मंदार केणी यांच्याकडून मदतीचा हात

मालवण : शहरातील धुरीवाडा येथे शुक्रवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये दुकानमालक विलास परुळेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार केणी यांच्याकडून श्री. परुळेकर यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

या आगीत परुळेकर यांच्या मालकीची दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये ते स्वतः चालवत असलेले शिलाई मशीनचे दुकानही भस्मसात झाले. या दुर्घटनेमुळे श्री. परुळेकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर मंदार केणी यांनी स्वतःच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!