असरोंडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांना पत्नीशोक

मालवण : असरोंडी येथील सौ. पूजा प्रशांत सावंत यांचे सोमवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. असरोंडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या त्या पत्नी होत्या.

सौ. पूजा या प्राथमिक शिक्षिका होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. यातच त्यांचे आकस्मिक निधन झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू, सासरे, आई असा परिवार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!