मालवणात होणार क्रिकेटचा महासंग्राम : सिंधुदुर्गातील मानाच्या ‘निलेश राणे चषकाचे’ अनावरण
बाबा परब मित्रमंडळ यांच्या वतीने १९ ते २२ एप्रिल दरम्यान बोर्डिंग ग्राउंड येथे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांच्या क्रिकेट स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांची क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेश राणे चषक डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या ‘निलेश राणे’ चषकाचे अनावरण रविवारी चिवला बीच येथे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, मालवण असोसिएशन सेक्रेटरी नंदू देसाई, पपु परब, राजू वडवलकर, सहदेव बापर्डेकर, विजय चव्हाण, सौरभ ताम्हणकर, अजिंक्य पाताडे, जगदीश चव्हाण, पूजा करलकर, पूजा वेरलकर, चारू आचरेकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, नितीन मांजरेकर, सुशील शेडगे, बंड्या पराडकर, ललित चव्हाण, विक्रांत नाईक, सुमित सावंत, राजू बिडये, नारायण लुडबे, संजय कदम, सोनू आचरेकर, प्रसाद पाटकर, अक्षय कदम, अमित सावंत, सुशील गावडे, विजय निकम, मनमोहन डिचोलकलर, निषय पालेकर, संदेश तळगांवकर, अमित फाटक, विरेश मांजरेकर, महेश नाईक, राजा मांजरेकर, सुशांत चौगुले, पंकज गावडे, संजय कडू, जॉमी ब्रिटो, लुईस फर्नांडिस यासह अन्य उपस्थित होते.
लाखोंची पारितोषिके
निलेश राणे चषक स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेतील विजेत्या संघास ३ लाख ५० हजार व निलेश राणे चषक, उपविजेत्या संघास १ लाख ७५ हजार व चषक तसेच अन्य पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.