कुडाळ, मालवणात मोफत नेत्र तपासणी शिबिरे ; आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे निमित्त

हेदूळ येथून शुभारंभ ; मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ आणि मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याची सुरुवात आज हेदूळ येथून करण्यात आली. हेदूळ येथील नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ सरपंच प्रतीक्षा पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिराला हेदूळ, खोटले, वायंगवडे व पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररोग तज्ञ डॉ. केळकर, डॉ. जोशी, डॉ. भाग्यश्री धामतिडक यांच्या उपस्थितीत नेत्रतपासणी करण्यात आली.

उद्या २१ मार्च रोजी वराड, २३ मार्च साळेल, २४ मार्च काळसे, हुमरमळा वालावल, व पिंगुळी शेटकरवाडी,२५ मार्च रोजी पोईप येथे नेत्रतपासणी शिबीर होणार आहे. नेत्र तपासणी केल्यावर ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा नागरिकांच्या डोळ्यांची आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेदूळ येथे सरपंच प्रतीक्षा पांचाळ, उद्योजक एस. पी. सामंत, आशिष परब, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, उपविभागप्रमुख निलेश पुजारे, भाऊ चव्हाण, माजी सरपंच नंदू गावडे, पोईप महिला विभाग प्रमुख आरती नाईक, शाखा प्रमुख संतोष हेदूळकर, संतोष सावंत, महेश पुजारे, सुनील जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3595

Leave a Reply

error: Content is protected !!