आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त असरोंडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(भाऊ) सावंत व मित्रमंडळ, आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसैनिक व शिवसेना शाखा असरोंडी यांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

असरोंडी मधील शिवसेना मार्फत हे पहिलेच शिबीर होते. पहिल्याच शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आमदार वैभव नाईक यांनी शिबिराला भेट देत सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभागीय संघटक अरुण घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, उपविभाग प्रमुख अंबाजी सावंत,अमित फोंडके, महिला विभाग प्रमुख आरती साटम,असरोंडी सरपंच अनंत पोईपकर, असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत, रामगड सरपंच शुभम मटकर, बुधवळे सरपंच पाणवलकर, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, ओवळीये उपसरपंच संजय पडवळ, असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, छोटू गावकर, असरोंडी शाखा प्रमुख सुनील सावंत, युवासेना विभाग प्रमुख बंडू गावडे, राजू घागळे, बबन येरम, श्री. मांजरेकर, स्वप्नील पुजारे,सचिन परब, हिवाळे शाखा प्रमुख गोट्या गावडे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3595

Leave a Reply

error: Content is protected !!