“एमआयटीएम” कॉलेजमध्ये १८ मार्च रोजी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर, पायथॉन डेव्हलपर, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या जागांसाठी मुलाखती होणार

मालवण | कुणाल मांजरेकर

ओरोस – सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ( MITM) कॉलेज मध्ये किरण अँकडमीच्या वतीने शनिवारी १८ मार्च रोजी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी (कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. BE कॉम्प्युटर, डिप्लोमा कॉम्प्युटर, बीएससी कॉम्प्युटर, एमएससी कॉम्प्युटर, BCA उमेदवारांना ही नोकरीची संधी देण्यात येणार आहे.

या जॉब मध्ये नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/GerMe995p4h EB26F7 ही लिंक देण्यात आली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे मेटोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य एस. सी.नवले यांनी आवाहन केले आहे. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), मु.पो.-सुकलवाड, ता.मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.416534 येथे या मुलाखती होणार आहेत. यामध्ये बीई कॉम्प्युटर, बीएससी. कॉम्पुटर, एमएससी कॉम्प्युटर, बीसीए, एमसीए BCA झालेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर, पायथॉन डेव्हलपर, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या जागांची भरती होणार आहे.

प्लेसमेंट ड्राइव्हसाठी मुलाखत प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. यात अभियोग्यता चाचणी – महाविद्यालयीन वर्गात ऑनलाइन गट चर्चा, कार्यक्रम चाचणी, वैयक्तिक मुलाखत घेतल्या जाणार आहेत. याकरिता किरण अँकडमी कडून विद्यार्थी आणि महाविद्यालयांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या संधीचा फायदा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भाग्यश्री एस. वाळके ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, स्टेप सेल, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग. मोबाईल : ७२१८३६५४४५ यांच्याशी संपर्क साधावा.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!