शिंदे – फडणवीस सरकारकडून देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथला विकास कामांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणेंच्या विशेष पाठपुराव्यामुळे कोट्यावधीचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचेही युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने तारकर्ली, देवबागसह वायरी भूतनाथ गावाला विकास कामांचे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात देवबाग आणि वायरी भूतनाथला धूप प्रतिबंधक बंधारा आणि संरक्षक भिंतीसाठी तब्बल 18 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याशिवाय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून निशाण काठी ते तारकर्ली समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली आहे.

अर्थ संकल्पात मंजूर झालेल्या कामांमध्ये देवबाग विठ्ठल मंदिर ते ख्रिश्चन वाडी येथे समुद्राकडील बाजूस धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ५ कोटी, देवबाग श्रीकृष्णवाडी येथील बापू राऊळ घर ते अरविंद राऊळ घरापर्यंत खाडी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर वायरी भूतनाथ तेली पाणंद ते माडये घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून निशाण काठी ते तारकर्ली समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!