रापण रिसॉर्ट वायरी येथे महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न ; भूषण साटम यांची संकल्पना
विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या ६० स्वयंसिद्ध महिलांचा भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार
मालवण | कुणाल मांजरेकर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रापण रिसॉर्ट येथे गुरुवारी सायंकाळी नारीशक्तीचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या ६० स्वयंसिद्ध महिलांचा रापण रिसॉर्टच्या वतीने भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले. उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते भूषण साटम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रापण रिसॉर्टस वायरी मार्फत गुरुवारी नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा सुविधा तिनईकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून वायरी भूतनाथच्या उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर उपस्थित होत्या. त्यांनी प्रभावीपणे विचार मांडले.
महिलांना समान दर्जा सोबतच महिला सबलीकरण यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कविता तळेकर, फॅनी फर्नाडिस, सारिका शिंदे यांनी गाणे सादर केले. डॉ. शुभांगी जोशी यांनी कविता वाचन केले. तर जयश्री हडकर यांनी मालवणी भाषेतून विचार मांडले. याप्रसंगी लायनेस क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, डॉ. सुमेधा नाईक , आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. शुभांगी जोशी, कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, सौ. स्मृती कांदळगावकर, सौ अन्वेशा आचरेकर, काजल झाड, सौ. स्नेहा जामसंडेकर, मनीषा प्रभूखानोलकर यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. वर ६० स्वयंसिद्ध महिलांचा रापण रिसॉर्टस तर्फे गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ऋतुजा केळकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पारकर, तनुश्री साटम, सायली मयेकर आणि दीक्षा गावकर यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर, शिल्पा खोत, शुभांगी सुकी, प्रियांका कांदळकर, मनीषा पारकर, स्वाती पारकर, दीक्षा गावकर, राखी ढोलम, मनीषा बागवे, ऋतुजा केळुसकर, सुवर्णा बागवे, संगीता पांगे, प्राजक्ता जोशी, बिंदू माशेलकर, मीना घुर्ये, श्रद्धा सावंत उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ महिला आणि सेवानिवृत्त शिक्षिका मीना केळकर आणि शैलजा पारकर यांनाही गौरविण्यात आले. यानिमित्ताने युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या संस्थापिका मेगल डिसोझा यांचा पर्यावरण संतुलनासाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.