मालवणात युवती सेनेकडून पदाधिकारी नियुक्त्यांचा झंझावात ; शिल्पा खोतांची व्यापक मोहीम

आ. वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही ; पदाधिकाऱ्यांची साथ

उपतालुकाप्रमुखपदी रूपा राजेश कुडाळकर यांची नियुक्ती ; तर मसुरे, हडी, कांदळगाव मध्येही पदाधिकारी नियुक्त्या

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण – कुडाळ तालुक्यात युवती सेना अधिक सक्षम करून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवणच्या प्रमुख समन्व्यक सौ. शिल्पा खोत यांच्या कडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मालवण तालुक्यात खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा धडाका हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये उपतालुकाप्रमुख पदी रूपा राजेश कुडाळकर, मसुरे विभाग युवा युवती अधिकारी पदी आर्या अभय गावकर, हडी शाखाप्रमुख पदी दिशा दशरथ गावकर, उप शाखाप्रमुख प्रज्ञा प्रकाश कदम, हडी बूथप्रमुख रिया राजन आचरेकर तसेच कांदळगाव वार्ड १ शाखाप्रमुख पदी हर्षदा दिनेश पाटकर, उपशाखाप्रमुख पदी प्रियांका प्रमोद परब, वार्ड २ शाखाप्रमुख पदी अनुष्का अमोल परब, उपशाखाप्रमुख पदी आशालता दिगंबर परब, वार्ड ३ शाखाप्रमुख पदी साक्षी भगवान कांदळकर, उप शाखाप्रमुख पदी पूजा सिद्धार्थ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून शहर व तालुका स्तरावर सातत्याने बैठका घेऊन, नव्या नियुक्त्या जाहीर करत युवती सेनेचा विस्तार व संघटन मजबुतीकरण याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे, सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा यतीन खोत व सहकारी यांचे कार्य सुरू आहे.

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात नुकतीच युवती सेनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मालवण तालुक्यातील मसुरे व हडी गावचा पदाधिकारी विस्तार सौ. खोत यांनी जाहीर केला. यामध्ये उपतालुकाप्रमुख पदी रुपा राजेश कुडाळकर यांचीही निवड त्यांनी जाहीर केली. या नूतन पदाधिकारी विस्तारात मसुरे विभाग युवती अधिकारी म्हणून आर्या अभय गांवकर यांची आणि हडी शाखाप्रमुख दिक्षा दशरथ गांवकर, हडी उपशाखाप्रुख प्रज्ञा प्रकाश कदम, हडी बुथप्रमुख रिया राजन आचरेकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख अंजना सामंत, शाखाप्रमुख विद्या फर्नांडिस, शाखाप्रमुख मंदा जोशी, दिपाली पवार, मालवण प्रभाग ४ शाखाप्रमुख दिया पवार, उपशाखाप्रुख नंदा सारंग, संतोष अमरे, सिद्धू मांजरेकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.

दरम्यान, युवती सेनेची नुकतीच कांदळगाव येथे बैठक संपन्न झाली. यावेळी देखील काही पदाधिकारी नियुक्त्या शिल्पा खोत यांनी जाहीर केल्या आहेत. यात कांदळगाव वार्ड १ : शाखाप्रमुख पदी हर्षदा दिनेश पाटकर, उपशाखाप्रमुख पदी प्रियांका प्रमोद परब, वार्ड २ : शाखाप्रमुख पदी अनुष्का अमोल परब, उपशाखाप्रमुख पदी आशालता दिगंबर परब, वार्ड ३ : शाखाप्रमुख पदी साक्षी भगवान कांदळकर, उप शाखाप्रमुख पदी पूजा सिद्धार्थ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कांदळगाव सरपंच रणजित परब यांच्यासह उपसरपंच दिव्या बागवे, सदस्य राजेंद्र कदम, सदस्य अनघा कदम, शाखाप्रमुख दीपक परुळेकर यांसह युवती सेना मालवण उपतालुकप्रमुख रुपा कुडाळकर, शहरप्रमुख निनाक्षी मेतर, मसुरे विभाग प्रमुख आर्या गांवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, दिया पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. मालवण तालुक्यात गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या सर्वच बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवती सेनेत काम करण्यासाठी, पदांची जबाबदारी घेण्यासाठी युवतींचा पुढाकार उत्स्फूर्त असाच दिसून आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!