माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा मालवणात आणखी एक विजय…

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह ग्रा. पं. सदस्याचा पराभव

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण तालुक्यात आणखी एक विजय मिळवला आहे. बुधवळे कृषि फलोत्पादन सहकारी संघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. या विजयाचे श्रेय भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचे असल्याची प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत विकास संस्थेच्या महत्वाच्या उमेदवाराच्या मतातील गणतीत याचे फार महत्व आहे. या निवडणुकीत भाजपचे आठही उमेदवार विजयी झाले. तर भटक्या विमुक्त जातीची एक जागा रिक्त आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांसह विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा दारुण पराभव झाला. निवडणूक अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पहिले.

या निवडणुकीत गुरूदास घाडी, राजेंद्र मुणगेकर, विश्वास हिर्लेकर, भानुदास येरम, सुभाष कदम, विनया पांगे, सुनंदा घाडी, सुधाकर शिरसेकर यांनी विजय मिळवला. यावेळी बाबू कदम, सचिन हडकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!