शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या मालवणात मेळावा

सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

“शिवगर्जना- आता जिंकेपर्यंत लढायचं!” या टॅगलाईन खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे मालवण तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई, पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, आ. रवींद्र वायकर , उपनेत्या मीनाताई कांबळे, माजी आमदार तुकाराम काते, माजी आमदार राजाभाऊ वाजे, आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, युवती सेनेच्या राजोल पाटील यांच्या सह मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

तरी या मेळाव्याला सर्व पदाधिकारी, महीला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना सर्व पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व निमंत्रित पदाधिकारी, सर्व सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सोसायटी सदस्य तसेच पुरुष व महिला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!