बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा काळात एसटी बस फेऱ्यात बदल करावा
शिवसेना ठाकरे गट मालवणच्या वतीने एसटी आगार अधिकाऱ्यांना निवेदन
मालवण : २० मार्च पर्यत बारावी परीक्षा सुरू असणार आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थी वर्गाचा विचार करता परीक्षा सुटण्याची वेळ व एसटी बस फेरी वेळ एकच असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचे ठरत आहे. एसटी निघून गेल्याने पर्यायी व्यवस्था व आर्थिक भुर्दंड विध्यार्थी व पालक वर्गास सहन करावा लागत आहे.
मालवण तालुक्याचा विचार करता आचरा, मसुरे, कट्टा या मार्गावर असणाऱ्या बसफेऱ्या पैकी परीक्षा पेपर सुटण्याच्या वेळात सुटणाऱ्या बसफेऱ्या काही मिनिटं उशिराने सोडाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक पंकज सादये, सिद्धेश मांजरेकर, वैभव खोबरेकर, करण खडपे, अक्षय भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान एसटी आगार अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती मंदार ओरसकर यांनी दिली.