राष्ट्रीय काँग्रेसकडून मालवणात शिवजयंती साजरी

वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व लाडू वाटप

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत वायरी येथील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लाडू वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद लुडबे यांनी केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगांवकर, ग्रामस्थ प्रदीप वेंगुर्लेकर, दत्ता मयेकर, डीचवलकर, श्री. मयेकर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर आणि इतर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!