कांदळगावात ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडानजिक शिवजयंती साजरी
मालवण | कुणाल मांजरेकर
किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने कांदळगाव रामेश्वर मंदिर समोर लावलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडानजीक रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सिंधुदुर्ग किल्ला उभारणीच्या वेळी काही अडचणी निर्माण झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी कांदळगावात येऊन श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले होते. यानंतर महाराजांनी स्वतःच्या हाताने येथील रामेश्वर मंदिरासमोर वडाचे झाड लावले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून येथे रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कु. दिव्या बागवे, सदस्य सौ कदम, सौ. मुळये. कांदळगाव ग्रामसेवक सागर देसाई मुळये, कर्मचारी वर्ग आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, त्याच प्रमाणे कांदळगाव देवस्थानचे उपसचिव विशाल राणे, कांदळगाव शिवसेना शाखाप्रमुख प्रभाग क्र. ३ जीवन कांदळगावकर, ग्रामस्थ साळ्कर , सावंत आणि गावातील युवा वर्ग उपस्थित होता.