“कोकण नाऊ” कडून बातम्यांबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही जोपासना ; निलेश राणेंकडून कौतुक
वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा राणेंच्या हस्ते शुभारंभ ; १५ ते १९ फेब्रुवारी पर्यंत चालणार स्पर्धा : राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग
मालवण | कुणाल मांजरेकर
कोकण नाऊचे संचालक विकास गावकर पत्रकारितेमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. डिजिटल मीडियामध्ये काम करताना कोकण नाऊच्या माध्यमातून त्यांनी बातम्यांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जोपासली असून त्यांच्या सामाजिक वाटचालीत आपले नेहमीच सहकार्य असेल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. कोकण नाऊ चॅनेलच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित व्हरेनीयम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.
या क्रिकेट स्पर्धेला आज मालवणच्या बोर्डिंग क्रिकेट ग्राउंडवर शानदार सुरुवात झाली. भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याहस्ते आणि व्हरेनियमच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन झाले. कोकण नाऊच्या वतीने गेली सलग दोन वर्षे या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे स्पर्धेचे तिसरे पर्व आहे. लीग स्वरूपात खेळली जाणारी आणि लाखोंची बक्षिसे असलेली कोकण पट्ट्यातली ही एकमेव स्पर्धा समजली जाते.
मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर १५ फेब्रुवारी ते १९ फ़ेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन भाजपचे प्रदेश सचिव तथा माजीं खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ ऍड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, आबा हडकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे यांनी काही चेंडू खेळत चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर झालेल्या उदघाटन सोहळ्यात मान्यवरांनी स्पर्धेचे कौतुक केले.
उदघाटन सोहळ्यानंतर सातेरी कर्ली विरुद्ध एस एस वारीयर्स या संघामध्ये सामना झाला. या सामन्याची नाणेफेक बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी कुणाल कुमार यांच्या हस्ते झाली. हा सामना सातेरी कर्ली संघाने जिंकला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्येष्ठ समालोचक बादल चौधरी यांनी केले.
यावेळी कोकण नाऊचे रोहन नाईक, मेघनाद सारंग, योगेश खाडे, उपस्थित होते. या स्पर्धेसाठी बादल चौधरी, श्याम वाक्कर, उमेश परब, अमोल जमदाडे, समीर चव्हाण यांनी समालोचन केले. आंबरोज अलमेडा, सुशील शेडगे, उमेश मांजरेजर, मंगेश धुरी, दीपक धुरी यांनी पंचगिरी केली. स्पर्धा प्रमुख म्हणून बंटी केरकर काम पाहत आहेत. कोकण नाऊच्या माध्यमातून या स्पर्धेचे चार कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण होत असून कोकण नाऊ युट्युब च्या माध्यमातून लाखो दर्शक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत.
स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्यासाठी रोख रु. २ लाख ५१ हजार, उपवीजेत्यासाठी २ लाख २५ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी रु. २५ हजार , चौथ्या क्रमांकासाठी रोख रु. २१ हजार आणि भव्य असे चषक दिले जाणार आहेत. त्याच बरोबर इतर वैयक्तिक पारितोषिके सुद्धा दिली जाणार आहेत.