अनधिकृत वाळू वाहतूक ; तीन डंपरना प्रत्येकी १.५७ लाखांचा दंड

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई

मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या डंपर पैकी तीन डंपरना मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी प्रत्येकी १ लाख ५७ हजार ६०० दंड ठोठावला आहे. मंगळवारी दंड रक्कम भरणा झाल्यानंतर तीनही डंपर सोडण्यात आल्याची माहिती मालवण तहसीलदार कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक यावर कारवाई सुरू असून देवली येथे तसेच अन्य मार्गावर पकडण्यात आलेल्या डंपरवर कारवाई सुरू आहे. तसेच देवली, वायंगणी, तोंडवळी फाटा व कांदळगाव याठिकाणी सापडलेल्या अनधिकृत वाळूसाठ्याचे मोजमाप करण्यात आले असून त्यावरही कारवाई सुरू आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!