मालवणात ८ ते १२ मार्च रोजी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा’ चषक”

१० लाख रुपये पारितोषिक रक्कमेची भव्य स्वरूपातील डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर ८ ते १२ मार्च रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल १० लाख रक्कमेची पारितोषिक ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण शाखा कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी शहर प्रमुख नंदू गवंडी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, महेश जावकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, सुहास वालावलकर, संमेश परब, अन्वय प्रभू, राका रोगे, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, फारूक मुकादम, साजिद बांगी, प्रथमेश राऊत, किरण वाळके, उमेश मांजरेकर, करण खडपे, चेतन खोत, बंटी केरकर, नाना नाईक, शाम वाक्कर यासह अन्य उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात भगवे वातावरण केले जाणार असून भव्यदिव्य स्पर्धा स्वरूपात वातावरण असणार आहे.

स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख ४८ रुपये (३,००,०४८), उपविजेत्या संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार ४८ (१,५०,०४८) व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी स्पर्धा अधिकारी बंटी केरकर मोबा. 9637232192 यांसह शाम वाक्कर, सुनील मालवणकर, किरण वाळके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!