वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अपघातात जखमी तरुणाला जीवदान

उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल; मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्घटना….

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्राण वाचले. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी धावाधाव करत जखमीला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी तात्काळ उपचार मिळाल्यानेच संबंधित तरुणाचे प्राण वाचले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या वर्दी पलीकडील माणुसकीचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर पींगुळी येथे एक अपघात घडला. त्यात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमीचे प्राण वाचवण्यासाठी धावाधाव केली. जखमीला तात्काळ उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेस उपचार केल्यामुळे संबंधित जखमीचे प्राण वाचू शकले. या मदतकार्यात सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्यासह, व्ही. एम. सावळ, एस. एस. मेस्त्री, ए. एम. जाधव आदींनी सहभाग घेतला होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!