फारूक शमसुद्दीन मुकादम यांची शिवसेना ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक शहरप्रमुखपदी नियुक्ती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शहर अल्पसंख्यांक विभाग मालवण शहर प्रमुखपदी फारूक शमसुद्दीन मुकादम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण शाखा कार्यालय येथे जेष्ठ नेते माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते फारुक यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, संमेश परब, नरेश हुले, मनोज मोंडकर, सचिन गिरकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!