कोकण शिक्षक मतदार संघात युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार…

मालवण मधील संयुक्त बैठकीत भाजप, शिंदे गटाकडून प्रचाराचे नियोजन

मालवण : कोकण शिक्षक मतदार संघातील युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची संयुक्त बैठक भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाकडून विजयाचा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी प्रचाराचे नियोजन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौकेकर, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, सहकार आघाडीचे बबलू राऊत, विलास हडकर, देविदास वेरलकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, पराग खोत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!