अभिमानास्पद : भारतीय सैन्य दलात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची सुभेदार मेजर पदी बढती
तिरोडा येथील बाळकृष्ण शेणई भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर पदी नियुक्त
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : भारतीय सैन्य दलात मागील २९ वर्ष सेवा बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा गावचे सुपूत्र बाळकृष्ण वामन शेणई यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली आहे. या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावचे सुपूत्र असलेल्या बाळकृष्ण शेणई यांना लहानपणापासूनच आर्मीत भरती होऊन देशसेवा करण्याची आवड होती. त्यासाठी खडतर परिश्रम करून २५ जून १९९३ रोजी ते भारतीय सैन्यात वायरलेस ऑपरेटर म्हणून भरती झाले. आर्मी मध्ये देशसेवा करतानाच त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तर २००५ मध्ये त्यांनी मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण देखील पूर्ण केले. आपल्या २९ वर्षाच्या सेवेत त्यांनी आसाम, सिक्कीम, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लदाख येथे सेवा बजावली असून सध्या ते गुजरात मधील बडोदा येथे इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत. नुकतीच त्यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.