… तर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार : निवडणूक आयोगाचा इशारा

नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांना निवडणूक आयोगाने केले आवाहन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी २० जानेवारी २०२३ पर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर रोजी ३२५ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी लावण्यात आला. ही निवडणूक ५ हजार ३३४ उमेदवारांनी लढवली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!