कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर २५ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ; संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर : श्री रेकोबा मित्रमंडळ आणि माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धिविनायक पटांगणावर २५ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २४ जानेवारी रोजी श्री गणेशाचे आगमन होणार असून २४ ते २९ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक होणार आहेत. यंदाचे उत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे.

२४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधी होणार आहेत. तर सायंकाळी ४ वाजता गणेश आगमन सोहळा, रात्री १० वाजता श्री महापुरुष कलावैभव पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ देवबाग यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. २५ जानेवारीला सकाळी १० वाजता गणेश मूर्ती पूजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा. संगीत भजन, रात्री ९ वा. व्हरायटी शो R.D.X. Crew M.J. डान्स एकेडमी, २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, १० वा. रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. संगीत भजन, रात्री ९ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कुडाळ यांचे “मायाजाल” महापौराणिक नाटक होणार आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, दुपारी ४.३० वा. हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा. संगीत भजन तर रात्री ९.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ” मेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा” हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, ११ वा. सत्यनारायणाची पूजा आणि तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा. संगीत भजन होणार आहे

२८ जानेवारीला रेकॉर्डडान्स स्पर्धा

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम तीन क्रमांकांना ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपये व चषक तर लहान गटात प्रथम तीन क्रमांकांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार आणि चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मंदार लुडबे ८५३०७२१८००/ ९५९५००९११०, अक्षय नरे ७७५७८८१८५५ किंवा करिष्मा लुडबे ७४२०८२४३०० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी २९ जानेवारी रोजी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होणार आहे. तरी गणेश भक्तांनी या कार्यक्रमाना सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रा. पं. सदस्य संजय लुडबे, माजी जि. प. सदस्य सौ. संजीवनी लुडबे आणि भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!