गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आ. वैभव नाईक यांची ग्वाही !

शिवसेना ठाकरे गट आडवली – मालडी जि. प. विभागाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

जि. पं., पं. स. निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल -आ. वैभव नाईक यांचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रा. पं. निवडणुकीत ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकत निवडून दिले त्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचे काम सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केले पाहिजे. गावात आपण जी जी विकासाची आश्वासने दिली ती पूर्ण करणार आहोत. शिवसेनेकडे आलेल्या प्रत्येक ग्रा.पं. ला २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा मी केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात १० लाख निधी देण्यात येत आहे. गावच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही. आडवली मालडी विभागात जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे येत्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा असरोंडी हायस्कुल येथे शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना गौरविण्यात आले. दरम्यान, असरोंडी येथील भाजप कार्यकर्ते सुनील वसंत सावंत व शिंदे गटाचे सुनील असरोंडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभाग प्रमुख अंबाजी सावंत, अमित फोंडके, शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत,श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, माजी सरपंच छोटू गावकर, श्री. सावंत सर, सातरल सरपंच सविता मेस्त्री, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाणवलकर, उपसरपंच स्वप्नाली वाळवे, राजू वाळवे, रामगड सरपंच शुभम मठकर, किर्लोस उपसरपंच श्री. लाड, माजी सरपंच बंडू सावंत, शिरवंडेचे रमेश गावकर, हिवाळेचे सचिन परब, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, उपसरपंच संजय पडवळ, बाळा सावंत, असरोंडी सरपंच अनंत पोईपकर, उपसरपंच आदित्य सावंत, आडवली सरपंच संदिप आडवलकर, उपसरपंच सोनाली पराडकर, शाखा प्रमुख दीपक घाडी, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, राठिवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच स्वप्नील पुजारे आदींसह शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!