टायर फुटून मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर उलटला

मुंबई -गोवा महामार्गावरील दुर्घटना ; अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान

कणकवली : अशोक लेलँड टेम्पोचा मागील टायर फुटून हा टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जानवली उड्डाण पुलावर घडली.

अपघात ग्रस्त टेम्पो एम. एच. ०८ बी. ए. ७७०७ हा चालक मुक्तार युनूस शेरखान (वय ३९, रा. राजापूर रत्नागिरी) हा राजापूर ते गोवा दरम्यान घेऊन जात होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सुधीर घारकर, दत्ता कांबळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील पलटी झालेला टेम्पो क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!