पत्रकार ते सरपंच ; वैभववाडीच्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री !

करुळ सरपंच पदाच्या निवडणुकीत ३९० चे मताधिक्य घेऊन विजय

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात गेली १२ वर्षे दै. प्रहार च्या माध्यमातून पत्रकारीता करणाऱ्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत करुळ सरपंच पदी नरेंद्र कोलते यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या कोलते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश कदम यांचा ३९० च्या मताधिक्याने पराभव केला. या निकालानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नरेंद्र कोलते गेली १२ वर्षे पत्रकारितेत आहेत. मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये करूळ ग्रामपंचायतचाही समावेश होता. या गावची लोकसंख्या अंदाजे २५०० इतकी आहे. तर एकूण मतदार १५८१ इतके आहेत. या ग्रामपंचायतीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नरेंद्र कोलते यांना सरपंच पदाची उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत ९९३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये नरेंद्र कोलते यांना ६६७ मते मिळाली. तर पराभूत उमेदवार महेश कदम यांना २८७ मते मिळाली. त्यांच्या विजयानंतर वैभववाडी भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच करूळमध्ये जल्लोष करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शिक्षक, शासकीय कर्मचारी यांनी कोलते यांचे अभिनंदन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!