वैभववाडीत भाजपची लाट ; १७ ग्रा. पं. पैकी ५ ठिकाणी सरपंच व ७० सदस्य बिनविरोध !

आ. नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी भाजप कार्यालयात सत्कार

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येथील जनतेने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ५ ग्रामपंचायत सरपंच व ७० सदस्य बिनविरोध निवडून दिले आहेत. आ. नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी भाजपा कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये जांभवडे सरपंच मानसी पवार, उपळे सरपंच दक्षता पालांडे, तिथवली सरपंच प्रियांका हरयाण, अरुळे सरपंच मानसी रावराणे, निमअरुळे सरपंच सज्जन माईनकर, व सदस्य अनंत रांबाडे,अस्मिता पालांडे, स्वप्नाली हातनकर, नवनाथ पालांडे, पूजा वाडेकर, समिता कदम, अनिल गुरव, अनिता गोसावी, वैष्णवी सकपाळ, मनोहर गावडे मिताली हडशी,प्रताप पालांडे,नितीन जाधव, राजश्री उपडे, चंद्रकांत पाष्टे, सुप्रिया मंचेकर, ओमकार हरयाण, सुरेश हरयाण, कामिनी कदम, रत्नप्रभा रावराणे, कामिनी कदम, रमेश वारंग, मारुती सोनार, क्रांती कर्पे, भिकाजी सुतार, सुप्रिया नारकर, अशोक अंगवलकर, प्रमिला कदम, सायली सावंत, अविनाश इस्वलकर, संजय कदम यांचा समावेश आहे. आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचे स्वागत करीत आभार मानले. यावेळी कामांच्या बाबत आपण कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही सर्व सरपंच व सदस्यांना दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!