सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी जनरल सेक्रेटरीपदी ओंकार यादव

मालवण : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष कला शाखेतील ओंकार बाबुराव यादव याची निवड करण्यात आली. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची प्रिती अनिल बांदल हिची निवड करण्यात आली.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद २०२२-२३ ची निवड प्रक्रिया आज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यामध्ये प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, स्टाफ सेक्रेटरी प्रा. के. के. राबते, क्रीडा विभागाच्या प्रा. डॉ.सुमेधा नाईक, IQAC समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले, एनएसएस समन्वयक प्रा. एस. पी. खोबरे, एनसीसीचे प्रा. डॉ. एम. आर. खोत, सांस्कृतिक विभागाचे प्रा. एच. एम. चौगले आदी सहभागी झाले होते. या विद्यार्थी परिषदेत रथराज धोंडू तुरी (सांस्कृतिक विभाग), तेजस संतोष कातवणकर (एनएसएस विभाग), नारायण रामचंद्र मुंबरकर (एनसीसी विभाग), दीपशिखा रवींद्र रेवंडकर (प्राचार्य (निर्देशित), प्रिती अनिल बांदल (प्राचार्य निर्देशित), चैताली अजय कुणकवळेकर (प्रथम वर्ष कला), कुणाल भगवान बिरमोळे (प्रथम वर्ष वाणिज्य), प्रीतम विलास गावडे (प्रथम वर्ष विज्ञान), प्रणाली आनंद बांदेकर (द्वितीय वर्ष कला), आकाश अनिल तावडे (द्वितीय वर्ष वाणिज्य), गौतमी प्रदीप चव्हाण (द्वितीय वर्ष विज्ञान), सिमरन नंदकिशोर मोंडकर (तृतीय वर्ष कला), प्रिती मंगेश खोबरेकर (तृतीय वर्ष वाणिज्य), विनीत योगेश मंडलिक (तृतीय वर्ष विज्ञान) यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी जनरल सेक्रेटरीपदी निवड झालेल्या ओंकार यादव यांचे प्राचार्य डॉ. ठाकूर व प्राध्यापक वर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार व माजी विद्यार्थी सर्वश्री प्रफुल्ल देसाई, महेश कदम, अमित खोत, भूषण मेतर, तसेच माजी विद्यार्थी ललित चव्हाण, वैभव खोबरेकर, विघ्नेश मांजरेकर, दुर्गेश गावकर, किरण करवडकर, पंकज कवटकर, संदीप पेडणेकर, अजय आळवे, विद्यार्थी कुणाल केळुसकर, तुषार मोर्ये, रीना मराळ, मिथिल मोर्वेकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!