भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत असरोंडीत ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

उपसरपंच मकरंद राणे यांचे प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण असरोंडी मळेवाडी, बौद्धवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल सावंत, उपशाखाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थानी भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी प्रयत्न केले.

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, युवा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, जि. प. चे माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, प्रशांत परब, नंदू आंगणे, बबन परब, बाळा राऊत यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संजय सावंत, रघुनाथ सावंत, रामचंद्र सावंत, मोहन सावंत, रामदास सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!