मुंबईत एमसीझेडएमएच्या कार्यालयात आ. वैभव नाईकांचं आंदोलन !

सिंधुदुर्गातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची कामं डावलल्याने वैभव नाईक आक्रमक

मालवण : एम.सी.झेड.एम.ए.च्या आज झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे डावलली असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबई नरिमन पॉईंट येथील एम.सी.झेड.एम.ए. च्या कार्यालयामध्ये आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वायरी, दांडी, सर्जेकोट, मसुरे खोत जुवा, तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मात्र सीआरझेड परवानगीमुळे ही कामे थांबली आहेत. गेले काही महिने पाठपुरावा करून देखील कामांना मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच आजच्या बैठकीत देखील सदर प्रकरणे अजेंड्यावर घेण्यात आलेली नाहीत त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंढरी तावडे, संदेश कानडे, अनंत पाटकर, अमोल पाटकर ,अक्षय देसाई, अजय रोहरा, विकास चिले आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!