भाजपाने दावा केलेल्या साळेल सरपंचाचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्कार
सरपंच रविंद्र सहदेव साळकर यांचे खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर भाजपाने काल दावा केला होता. यातील साळेल गावातून बिनविरोध झालेले सरपंच रविंद्र सहदेव साळकर हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बैठकीत दिसून आले. या सरपंचांवर ठाकरे गटाने दावा केला असून खासदार विनायक राऊत यांनी सरपंच श्री. साळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मालवण शहरातील कोळंब सागरी महामार्ग येथील हॉटेल आराध्य मध्ये आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साळेल गावातून बिनविरोध आलेल्या सरपंच रविंद्र सहदेव साळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संग्राम प्रभुगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, जान्हवी सावंत यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपने कालच साळेल सरपंच हा आपला असल्याचा दावा केला होतं. मात्र आज भाजपचा हा दावा फोल ठरला आहे.