राज ठाकरे नाराज ; मनसेच्या कणकवलीतील बैठकीकडे फिरवली पाठ

सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांमध्ये असमन्वय ; दोन दिवसात पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घेणार : बाळा नांदगावकर यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील गटबाजीचा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात विस्फोट झाला आहे. पदाधिकाऱ्यांमधील असमन्वय पाहून राज ठाकरे यांनी कणकवलीत आयोजित बैठकीकडे पाठ फिरवली. आम्ही केलेल्या विनंतीमुळे राज ठाकरे ता बैठकीला आले नसून येत्या दोन दिवसात पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज यांनी यांचा दौरा पूर्ण नियोजित होता. तरी देखील पदाधिकारी बैठकीत काही मनसैनिक आले आहेत, ही गंभीर बाब असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबाबत येत्या दोन दिवसांत पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील. आम्ही केलेल्या विनंती मुळे राज ठाकरे या बैठकीला आले नाही, पुढील दौरा रत्नागिरीच्या दिशेने राज ठाकरे यांचा होईल,अशी माहिती मनसेनेतील बाळा नांदगावकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, पदाधिकाऱ्यांमध्ये अनास्था आहे. पक्षात समन्वय राहिलेला नाही, मात्र राज ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन अनेक लोक काम करण्यास तयार आहेत.त्या दृष्टीने राज ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील,असे ते म्हणाले. स्वतः साहेब येणार हे माहीत असताना कणकवलीत सभागृह नाही ? काय परिस्थिती आहे. येथील परिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी येथे येऊ नये, अशी परिस्थिती आहे. साहेबांनी केवळ फोटो मारण्यासाठी यावं का ? काय करायचे ? महाराष्ट्र सैनिकांनी काम केलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी पदाना नाय देऊ शकत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तुम्हीच गंभिरपणे विचार करावा,अश्या शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

कणकवली विधानसभा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अवघ्या ५ मिनिटांची बैठक झाली.या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर,माजी आ.परशुराम उपरकर,जिल्हाध्यक्ष धीरज परब,दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!