मालवण | ग्रा. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात इनकमिंग सुरूच

काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळू वस्त भाजपामध्ये दाखल

मालवण : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इनकमिंग सुरूच असून काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळू वस्त यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत वस्त यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मालवण भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक तोडणकर, आबा हडकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, विजय कदम यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे वायंगणीसह तालुक्यातील विकासकामे करू शकतात यासाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वस्त यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!