राज ठाकरे यांचे चौके येथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत

ठाकरेंचा आज देवबागात मुक्काम ; उद्या आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सायंकाळी मालवण दौऱ्यावर पोहचले. चौके येथे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्यासह मनसे, मनविसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य – दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

राज ठाकरे यांचे चौके, कुंभारमाठ जानकी सभागृह व हॉटेल सॅफरॉन येथे आगमन होताच सुहसिनींनी औक्षण केले. त्यांनंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील युवकांचा मनसेमध्ये प्रवेश झाला. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, निशा आजगावकर, माया माणगावकर, वैष्णवी सरफरे, सुजाता फाटक, साक्षी चुडनाईक, भारती वाघ, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विल्सन गिरकर, अमित इब्रामपूरकर, उदय गावडे, विशाल ओटवणेकर तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे आज देवबाग येथे मुक्काम करून शुक्रवारी सकाळी आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!