सुनील घाडीगावकरांचा शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; शिरवंडेचा शाखाप्रमुख भाजपात

मालवण : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मालवण तालुक्यातील शिरवंडे गावात शिवसेना ठाकरे गटाला भाजप नेते, माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गट शिरवंडे शाखाप्रमुख रघु गावकर, नितेश गावकर यांनी गुरुवारी भाजप पक्षात प्रवेश केला. मालवण भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, भाजप युवमोर्चा प्रभारी तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, (आचरा विभाग) सुशांत घाडीगांवकर, श्रावण सरपंच प्रशांत परब, सोसायटी संचालक सुरेश गावकर, विजय खांडेकर, कैलास गावकर, प्रमोद घाडी, नमिता गावकर यासह अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!